नको रे बाळा वाट वाकडी धरू नको

 


नको रे बाळा वाट वाकडी धरू नको

संधी दवडू नको , स्वप्न  मोडू नको

नको रे बाळा वाट वाकडी धरू नको


शिकण्यासाठी राजा तुला कॉलेजला धाडिलं

तुझ्या यशाचं तुझ्या सुखाचं स्वप्न आम्ही पाहिलं

गरिबीचे चटके सोसू , झळ तुला न लागावी

आता मागं बघू नको , भूतकाळ आठवू नको 

नको रे बाळा वाट वाकडी धरू नको


दुनिया नाही बरी बुरी , दृष्टी असावी खरी

स्रीजातीचा मान ठेव लक्ष्मी नांदेल घरी

तारुण्याच्या या वाटेवर भान हरवू नको

आमच्या स्वप्नांना बाळा कात्री लावू नको

कर्तव्य विसरू नको , नाती तोडू नको

नको रे बाळा वाट वाकडी धरू नको


तुझी जिद्द , आमचे कष्ट सार्थकी लागावे

तुझ्या रूपाने विश्वाचे दर्शन घडावे

समाजसेवा , देशसेवा इथेच घडावी 

तुझ्या यशातच आता पंढरी बघावी

वृद्धाश्रम दावु नको , पोरकं करू नको

नको रे बाळा वाट वाकडी धरू नको

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपली मराठी ?

हे कोणी सांगत का नाही ??