पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चला , यावरही बोलूयात !

  बापरे ! त्याना मुलगी नाही ,  मुलेच आहेत . किंवा त्यांना मुलगा नाही , मुलीच आहेत .  त्यांना एकटीच मुलगी आहे अस काही न काही हल्ली बऱ्याचदा कानावर पडत .  म्हणजे एकंदरीतच मुलगी नसेल तर आई ला जीव लावणारी , बापाकडून हट्ट करून घेणारी , माया करणारी परी घरात नसेल .आणि मुलगा नसला तर .... तर काही विचारूच नका , किती गोष्टी नडतात ! कोणी म्हातारपनि आधार नाही म्हणतं तर कोणी शेवटी पाणी पाजायला मुलगा हवाच असतो म्हणतो        पण खरंच याच्याशिवाय आपण आपलं आयुष्य zero समजत असू तर 'वृद्धाश्रम' हे ही वास्तव आपण नाकारू शकत नाही .त्यामुळे सांगण्याचा भाग इतकाच की नसलेल्या आप्त्यांंचा विचार करण्यापेक्षा असलेल्या लेकरांवर focus करा .        आणि हा अजून एक , मुलगी नसणाऱ्यांना सुनेचे लाड करायची ,आई वडिलांची स्वप्न 18 / 20 वयापर्यंत  पूर्ण न करू शकणाऱ्या मुलींना सासू सासऱ्यांंची स्वप्न पूर्ण करण्याची संधी ही मिळतेच .आणि जर का तुम्ही जावई असाल त्या घराचे ज्या घरात मुलगा नाही .मग तर तुम्ही फार lucky आहेत ! फार कमी मुलांना सासू सासऱ्यांची सेवा करायच...

नको रे बाळा वाट वाकडी धरू नको

  नको रे बाळा वाट वाकडी धरू नको संधी दवडू नको , स्वप्न  मोडू नको नको रे बाळा वाट वाकडी धरू नको शिकण्यासाठी राजा तुला कॉलेजला धाडिलं तुझ्या यशाचं तुझ्या सुखाचं स्वप्न आम्ही पाहिलं गरिबीचे चटके सोसू , झळ तुला न लागावी आता मागं बघू नको , भूतकाळ आठवू नको  नको रे बाळा वाट वाकडी धरू नको दुनिया नाही बरी बुरी , दृष्टी असावी खरी स्रीजातीचा मान ठेव लक्ष्मी नांदेल घरी तारुण्याच्या या वाटेवर भान हरवू नको आमच्या स्वप्नांना बाळा कात्री लावू नको कर्तव्य विसरू नको , नाती तोडू नको नको रे बाळा वाट वाकडी धरू नको तुझी जिद्द , आमचे कष्ट सार्थकी लागावे तुझ्या रूपाने विश्वाचे दर्शन घडावे समाजसेवा , देशसेवा इथेच घडावी  तुझ्या यशातच आता पंढरी बघावी वृद्धाश्रम दावु नको , पोरकं करू नको नको रे बाळा वाट वाकडी धरू नको

आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय !

आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय ! रुढी परंपरेच्या विळख्यात अंधश्रद्धेला बळी पडतोय आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय ! 21व्या शतकातही बदलायला तयार नाही चांगले,वाईट काही मानायलाच तयार नाही माणसातली माणुसकी हरवत चालली आहे  हृदयातलाच देव दिसेनासा झाला आहे  इथे घरात प्रकाश , अन मनात काळोख तसाच दिसतोय  आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय ! माणसा माणसात देव असतोय ,पशु प्राण्यांतही देव असतोय  तरीही का? आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय ! आई वडील वृद्धाश्रमात , जागा नाही मनात बढती साठी नवस , मंदिरातल्याच देवास कष्टकऱ्याला साथ, गरिबाला मदत हवी आहे  माणसात देव शोधुन सेवा त्याचीच करणे आहे जन्म आणि मरण या दोघातलच आयुष्य आहे  पैसा , गाडी , बंगला या पेक्षाही सुंदर भविष्य आहे समाजसेवा , देशसेवा सेवेसाठीच जन्म असतोय तरीही का ? आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय !

मनाची सफाई

 आपण घरा बाहेरचा कचरा घरात आणतो का ?  आपण तर घरातला कचरा पण घरात ठेवत नाही , होय ना ?  मग दुसऱ्याच्या वाईट सवयींंचा , विचारांचा तरी कचरा का आपण आपल्या मनात साठवून ठेवायचा . ♥️#मनाची सफाई♥️

हे कोणी सांगत का नाही ??

       नाकरी की व्यवसाय ? असा प्रश्न आजवर तुम्हाला पडला असेलच .हो ना ?  तर........सद्या नोकरी म्हणलं की फक्त सरकारी नोकरीलाच आपण value देतो . कारण इथे भरमसाठ पगार , सुट्ट्या , भत्ते , पेन्शन या साऱ्या गोष्टी असतात. ' Business मे तो हम ही राजा ' असं चित्र आजच्या पिढी समोर आहे .परिणाम,  UPSC /MPSC अश्या परिक्ष्यांची तयारी करणाऱ्याची संख्या वाढली .केवळ स्पर्धा वाढून फायदा काय . लहान बाळाला भूक नसतानाही खाऊ घातलं तर ते उलटी करत . तसच आहे हे . मग आत्महत्या .....स्वप्नील लोणकर ला विसरला नसालच . या आणि अशा किती जणांनी जीव गमावला .  Never give up असं motivational speaker सांगतात .पण थोडं थांबून आपण योग्य मार्गानेच आहोत ना .की फक्त चालत आहोत वाट चुकल्या सारखे याचाही विचार करा हे का नाहीत सांगत .दोन वेळच्या जेवणाची सोय करणं जितकं गरजेचं तितकंच ते वेळच्यावेळी पोटात घालणं ही .  पैसा कमावणे जितकं महत्वाचं तितकंच तो योग्य मार्गानं कमावनही .  असा डोळे दिपवणार बंगला काय कामाचा ज्यात तुम्ही समाधान शोधुचं शकतं नसाल . जगायचं म्हणजे पैसा हवाच , मान्य , पण तो कमा...

संसार

  काल परवा पर्यंत जे माझं घर म्हणवलं जायचं  ते आज माहेर  बनून गेलं एक नवी पहाट , एक नवी सुरवात  त्याला सासर असं नाव दिल .....

तिन्हीसांज

 तिन्हीसांज शांत असावी . मन शांत करणारी . दिव्याने देवघर आणि समाधानाने मन प्रसन्न करणारी . दिवसभराच्या कामाची  पावती देणारी . थोडा विरंगुळा देणारी .....#तिन्हीसांज

थोडं हिताचं

 आयुष्यात काही वेळा बहिरं 🙉, आंधळं 🙈, मुकं 🙊व्हावं लागतं .आरोग्यासाठी चांगलं असतं ....दुसऱ्याच्या नाही ...स्वतःच्या 😇 #थोडंहिताच