हे कोणी सांगत का नाही ??
नाकरी की व्यवसाय ? असा प्रश्न आजवर तुम्हाला पडला असेलच .हो ना ?
तर........सद्या नोकरी म्हणलं की फक्त सरकारी नोकरीलाच आपण value देतो . कारण इथे भरमसाठ पगार , सुट्ट्या , भत्ते , पेन्शन या साऱ्या गोष्टी असतात. ' Business मे तो हम ही राजा ' असं चित्र आजच्या पिढी समोर आहे .परिणाम, UPSC /MPSC अश्या परिक्ष्यांची तयारी करणाऱ्याची संख्या वाढली .केवळ स्पर्धा वाढून फायदा काय . लहान बाळाला भूक नसतानाही खाऊ घातलं तर ते उलटी करत . तसच आहे हे . मग आत्महत्या .....स्वप्नील लोणकर ला विसरला नसालच . या आणि अशा किती जणांनी जीव गमावला .
Never give up असं motivational speaker सांगतात .पण थोडं थांबून आपण योग्य मार्गानेच आहोत ना .की फक्त चालत आहोत वाट चुकल्या सारखे याचाही विचार करा हे का नाहीत सांगत .दोन वेळच्या जेवणाची सोय करणं जितकं गरजेचं तितकंच ते वेळच्यावेळी पोटात घालणं ही . पैसा कमावणे जितकं महत्वाचं तितकंच तो योग्य मार्गानं कमावनही . असा डोळे दिपवणार बंगला काय कामाचा ज्यात तुम्ही समाधान शोधुचं शकतं नसाल . जगायचं म्हणजे पैसा हवाच , मान्य , पण तो कमावताना जगणं विसरायचं का ? जबाबदाऱ्या पेलताना आपण एक माणूस आहोत मशीन नाही हे तर आपण विसरत नाहीत ना ? याचाही विचार करायला हवा ना ...........
असो , शेवटी सांगायचं एवढंच की
आपला कोणता दिवस कोणता क्षण शेवटचा आहे हे आपल्याला ही माहीत नाहीये .
So थोडं जपून .
मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचताना प्रवासाचा आनंद लुटायचा राहू नये इतकंच .
तुमचं मत comment करायला विसरू नका.
टिप्पण्या