आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय !

आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय !

रुढी परंपरेच्या विळख्यात अंधश्रद्धेला बळी पडतोय

आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय !


21व्या शतकातही बदलायला तयार नाही

चांगले,वाईट काही मानायलाच तयार नाही

माणसातली माणुसकी हरवत चालली आहे 

हृदयातलाच देव दिसेनासा झाला आहे 

इथे घरात प्रकाश , अन मनात काळोख तसाच दिसतोय 

आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय !


माणसा माणसात देव असतोय ,पशु प्राण्यांतही देव असतोय 

तरीही का?

आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय !


आई वडील वृद्धाश्रमात , जागा नाही मनात

बढती साठी नवस , मंदिरातल्याच देवास

कष्टकऱ्याला साथ, गरिबाला मदत हवी आहे 

माणसात देव शोधुन सेवा त्याचीच करणे आहे

जन्म आणि मरण या दोघातलच आयुष्य आहे 

पैसा , गाडी , बंगला या पेक्षाही सुंदर भविष्य आहे


समाजसेवा , देशसेवा सेवेसाठीच जन्म असतोय

तरीही का ?

आजही माणूस मंदिरातच देव शोधतोय !



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपली मराठी ?

हे कोणी सांगत का नाही ??

नको रे बाळा वाट वाकडी धरू नको