चला , यावरही बोलूयात !
बापरे ! त्याना मुलगी नाही , मुलेच आहेत . किंवा त्यांना मुलगा नाही , मुलीच आहेत . त्यांना एकटीच मुलगी आहे अस काही न काही हल्ली बऱ्याचदा कानावर पडत . म्हणजे एकंदरीतच मुलगी नसेल तर आई ला जीव लावणारी , बापाकडून हट्ट करून घेणारी , माया करणारी परी घरात नसेल .आणि मुलगा नसला तर .... तर काही विचारूच नका , किती गोष्टी नडतात ! कोणी म्हातारपनि आधार नाही म्हणतं तर कोणी शेवटी पाणी पाजायला मुलगा हवाच असतो म्हणतो
पण खरंच याच्याशिवाय आपण आपलं आयुष्य zero समजत असू तर 'वृद्धाश्रम' हे ही वास्तव आपण नाकारू शकत नाही .त्यामुळे सांगण्याचा भाग इतकाच की नसलेल्या आप्त्यांंचा विचार करण्यापेक्षा असलेल्या लेकरांवर focus करा .
आणि हा अजून एक , मुलगी नसणाऱ्यांना सुनेचे लाड करायची ,आई वडिलांची स्वप्न 18 / 20 वयापर्यंत पूर्ण न करू शकणाऱ्या मुलींना सासू सासऱ्यांंची स्वप्न पूर्ण करण्याची संधी ही मिळतेच .आणि जर का तुम्ही जावई असाल त्या घराचे ज्या घरात मुलगा नाही .मग तर तुम्ही फार lucky आहेत ! फार कमी मुलांना सासू सासऱ्यांची सेवा करायची संधी मिळते . त्यातही फार कमी जणांना ती संधी आपल्याकडे आहे याची जाणीव असते .
त्यामुळे वेळ निघून जाण्याआधीच सावध व्हायला हवं . कदाचित उद्या वेळ असेल , पण ही माणसंच नसतील तर ???.....तर मात्र खरच उशीर झाला असेल . होय ना ?
सांगणाऱ्यालाही सगळं जमतचं असं नाही , पण प्रयत्न मनापासून चालू असतात .
टिप्पण्या