#लेख
#कमी शब्दात सुंदर विचार
#कविता(कोमल ची कविता❤️)
#सामायिक विषय
#रोजचे जीवन
तिन्हीसांज
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
तिन्हीसांज शांत असावी . मन शांत करणारी . दिव्याने देवघर आणि समाधानाने मन प्रसन्न करणारी . दिवसभराच्या कामाची पावती देणारी . थोडा विरंगुळा देणारी .....#तिन्हीसांज
मराठी भाषेला आपण आपली समजतोय का ? आता तुम्ही म्हणाल हो म्हणजे काय , आम्हाला अभिमान आहे , गर्व आहे आमच्या भाषेचा .खरं आहे , पण हे अर्धवट सत्य आहे . हो , थोडं अधिक स्पष्ट करून सांगते . जन्म झाला आणि आपल्या कानावर पहिला शब्द मराठी पडला . हळूहळू आपण मराठी बोलायलाही शिकलो . नंतर शाळेत गेलो आणि मराठी , हिंदी , इंग्रजी , संस्कृत अश्या आणखी काही भाषांची ओळख झाली . तुम्ही कधी शाळेत असताना कवितांना चाल लावून त्या म्हणायचात का ? मला हे प्रचंड आवडायचं . नवीन वर्षाची , नवीन इयत्ते ची पुस्तके मिळाली , की पहिल्यांदा सगळ्या कविता वाचून काढायच्या . त्यात काही कवितांना सिनेमातील गाण्याच्या तर काही अगदी वेड्या वाकड्या चाली लावायच्या . वर्गात शिक्षक नसताना बाकावरती ( बेंच ) हाताने वाजवून ( तबला वादकच जणू आम्ही ) त्या कविता म्हणण्याचा आनंद काही निराराच . मला पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकातील 'इंद्रजित भालेराव' लिखित 'बाप' कविता खूप आवडते . हो आवडते म्हणतेय , कारण आजही शेतात गेल्यानंतर आपल्या बापाला शेतात काम करताना पाहून "माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशि...
नाकरी की व्यवसाय ? असा प्रश्न आजवर तुम्हाला पडला असेलच .हो ना ? तर........सद्या नोकरी म्हणलं की फक्त सरकारी नोकरीलाच आपण value देतो . कारण इथे भरमसाठ पगार , सुट्ट्या , भत्ते , पेन्शन या साऱ्या गोष्टी असतात. ' Business मे तो हम ही राजा ' असं चित्र आजच्या पिढी समोर आहे .परिणाम, UPSC /MPSC अश्या परिक्ष्यांची तयारी करणाऱ्याची संख्या वाढली .केवळ स्पर्धा वाढून फायदा काय . लहान बाळाला भूक नसतानाही खाऊ घातलं तर ते उलटी करत . तसच आहे हे . मग आत्महत्या .....स्वप्नील लोणकर ला विसरला नसालच . या आणि अशा किती जणांनी जीव गमावला . Never give up असं motivational speaker सांगतात .पण थोडं थांबून आपण योग्य मार्गानेच आहोत ना .की फक्त चालत आहोत वाट चुकल्या सारखे याचाही विचार करा हे का नाहीत सांगत .दोन वेळच्या जेवणाची सोय करणं जितकं गरजेचं तितकंच ते वेळच्यावेळी पोटात घालणं ही . पैसा कमावणे जितकं महत्वाचं तितकंच तो योग्य मार्गानं कमावनही . असा डोळे दिपवणार बंगला काय कामाचा ज्यात तुम्ही समाधान शोधुचं शकतं नसाल . जगायचं म्हणजे पैसा हवाच , मान्य , पण तो कमा...
नको रे बाळा वाट वाकडी धरू नको संधी दवडू नको , स्वप्न मोडू नको नको रे बाळा वाट वाकडी धरू नको शिकण्यासाठी राजा तुला कॉलेजला धाडिलं तुझ्या यशाचं तुझ्या सुखाचं स्वप्न आम्ही पाहिलं गरिबीचे चटके सोसू , झळ तुला न लागावी आता मागं बघू नको , भूतकाळ आठवू नको नको रे बाळा वाट वाकडी धरू नको दुनिया नाही बरी बुरी , दृष्टी असावी खरी स्रीजातीचा मान ठेव लक्ष्मी नांदेल घरी तारुण्याच्या या वाटेवर भान हरवू नको आमच्या स्वप्नांना बाळा कात्री लावू नको कर्तव्य विसरू नको , नाती तोडू नको नको रे बाळा वाट वाकडी धरू नको तुझी जिद्द , आमचे कष्ट सार्थकी लागावे तुझ्या रूपाने विश्वाचे दर्शन घडावे समाजसेवा , देशसेवा इथेच घडावी तुझ्या यशातच आता पंढरी बघावी वृद्धाश्रम दावु नको , पोरकं करू नको नको रे बाळा वाट वाकडी धरू नको
टिप्पण्या